कॅनडात मोटारीने अनेकांना चिरडले; नऊ ठार   

ओटावा : कॅनडातील व्हँकुव्हर शहरात आयोजित ’लापू लापू फिलिपिनो फेस्टिव्हल’मध्ये एका वेगवान मोटार गर्दीत येऊन झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. व्हँकुव्हर पोलीस विभागाने ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अव्हेन्यू आणि कव्हरमधील फ्रेझर स्ट्रीट जवळ ही घटना भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली. मात्र, यामध्ये किती जण जखमी झाले आहेत, याबाबत पोलिसांनी अद्याप माहिती दिलेली नाही.
 
पोलिसांनी मोटार चालकाला ताब्यात घेतले आहे. फिलीपिन्सच्या पहिल्या राष्ट्रीय नायकाच्या स्मरणार्थ आयोजित वार्षिक कार्यक्रम ’लापू लापू डे ब्लॉक पार्टी’ येथे साजरी केली जात होती. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

Related Articles